भाग - १
लोकसभेच्या निवडणूका ही देशाच्या राजकीय जीवनातील अतिशय महत्वपूर्ण घटना आहे. भारतीय जनता नवीन सरकार निवडीसाठी १५ व्या वेळेस सिद्ध होत आहे. गेली साठ वर्षे भारतीय जनता या लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेल्या मताधिकाराच्या सहाय्याने लोकसभेत आपला उमेदवार पाठवित आहे. तरी अजुनही जनतेच्या इच्छांची पूर्ती अपूर्णच राहीली आहे. विकासाचे सारे फ़ायदे शहरी व ग्रामीण श्रीमंतांनी बळकावले आहेत. बहुसंख्य जनता मात्र भूक आणि गरिबीकडे जास्तीत जास्त ढकलली जात आहे.





